Ad will apear here
Next
पुणे येथे महा-योजना शिबिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


पुणे : आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने कोथरूड मतदारसंघातील आयोजित करण्यात आलेल्या महा-योजना शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहरातील नागरिकांसाठी अतिशय उत्तम व आवश्यक असे महा-योजना शिबिर राबविले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांचे त्यांचे कौतुक केले.

केंद्र व राज्य सरकारने नागरिकांसाठी अन्नधान्य सुरक्षा योजना, मागासवर्गीय अनुदान योजना, अपंग कल्याणकारी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, महिला बालकल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री आवास, जीवन सुरक्षा, जीवन ज्योती बिमा, मातृ वंदन योजना, उज्ज्वला योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना यांसारख्या अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांचे स्टॉल्स या शिबिरामध्ये लावण्यात आले आहेत. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहरात एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल फडणवीस यांनी आमदार कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.



मुख्यमंत्र्यांनी योजनांच्या स्टॉल्सना भेट देऊन लाभार्थींची माहिती जाणून घेतली; तसेच अपंग कल्याणकारी योजना, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत योजना, अन्नधान्य सुरक्षा योजना आदी योजनांचे लाभार्थी व कोथरूड मतदारसंघातील वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ यांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिरामध्ये तीन हजारपेक्षा जास्त लाभार्थींनी सहभाग घेतला. महिला बालकल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, आधारकार्ड, अन्नधान्य सुरक्षा योजना यांसारख्या योजनांच्या लाभार्थींची संख्या लक्षणीय होती. या शिबिरादरम्यान ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.   



शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश विद्यालयाचे लाहोटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, कोथरूड मतदारसंघातील नगरसेवक-नगरसेविका, अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. २० फेब्रुवारीलाही हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहील.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZMUBX
Similar Posts
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
‘दिव्यांग नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणार’ पुणे : ‘दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत तसेच सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.
‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’ पुणे : ‘समाजमाध्यमांमुळे वाचनसंस्कृतीचे स्वरूपही बदलत आहे. हा बदल सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. त्यासाठी सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language